साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना ‘ भारतरत्न ‘ द्या : ना.बनसोडे यांची मागणी
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना ‘ भारतरत्न ‘ द्या : ना.बनसोडे यांची मागणी
उदगीर : श्रीधर सावळे : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना दलित साहित्याचे उद्गाते म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात त्यांच्या साहित्याचे योगदान आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी शोषिंताच्या व्यथा साहित्यातुन मांडल्या व त्यांना न्याय दिला असल्याचे मत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी केले.
ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या सार्वजनिक जयंती महोत्सव समिती उदगीरच्या वतीने आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी माजी आ.गोविंदराव केंद्रे, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, बन्सीलाल कांबळे, देविदास कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिणीस समीर शेख, तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, भाजपाचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, सुधीर भोसले, कार्याध्यक्ष वसंत पाटील, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर, मुख्याधिकारी सुंदर बोंदर, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, सेवानिवृत्त न्यायाधीश भाले, महिला जिल्हाध्यक्षा मीनाक्षी शिंगाडे, दिपाली औटे, शहराध्यक्षा मधुमती कनशेट्टे, ऍड. वर्षाताई पंकज कांबळे, प्रा.शिवाजी देवनाळे, जवाहरलाल कांबळे, रवींद्र बेंद्रे, प्रा.बिभीषण मद्देवाड, प्रल्हाद येवरीकर, प्रा.गोविंद भालेराव, शिवाजी सुर्यवंशी, प्रा.सुशिलकुमार चिमोरे, नजीर हाशमी, सुशिलाबाई लांडगे, सुनिल कांबळे, राजकुमार चव्हाण, फय्याज शेख, ऍड.दत्ता पाटील, गणेश गायकवाड, इब्राहिम नाना पटेल, प्रदीप जोंधळे, काजल मिरजगावे, वैशाली कांबळे, आशा रेड्डी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. संजय बनसोडे यांनी, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे कार्य मोठे असुन समाजबांधवांच्या भावनेचा व मागणीचा विचार करुन त्यांना ‘ भारतरत्न ‘ हा सर्वोच्च सन्मान देवून गौरव करावा, अशी विनंती राज्य शासनाच्या वतीने ठराव केंद्राकडे पाठवावा. अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवॆंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
चिराग नगरमध्ये अण्णाभाऊ साठेंचे स्मारक उभारणार आहे. तर पुण्याला लहुजी साळवे यांचे स्मारक उभारत आहोत. बार्टीच्या तत्वावर अर्टीची स्थापना झाली असून यामुळे मातंग समाजातील तरुण मुलांना याचा फायदा होईल. भविष्यात उदगीर शहरात अण्णाभाऊ साठेंचा पुर्णाकृती पुतळा उभारुन पुतळ्या शेजारी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या नावाने म्युझियम, स्मारक व अभ्यासिकेसाठी १५ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला असुन लवकरच या ही कामाला सुरुवात होणार आहे. मागील काळात उदगीर मतदार संघात सामाजिक सलोखा ठेवुन उदगीर मतदार संघाचा विकास केला आहे. येत्या काळातही उदगीरला विकासाच्या माध्यामातून महाराष्ट्रात एक नंबर आणणार असल्याची ग्वाही ना.बनसोडे यांनी उपस्थित समाजबांधवांना दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रल्हाद येवरीकर यांनी केले तर आभार प्रा.बिभीषण मद्देवाड यांनी मानले.
यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post