• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ग्लोबल कोकण बीच फेस्टीव्हल व कोकण सरस प्रदर्शन पालघर, शिरगाव समुद्र किनारी…

ग्लोबल कोकण बीच फेस्टीव्हल व कोकण सरस प्रदर्शन पालघर, शिरगाव समुद्र किनारी...

by
February 15, 2026
in Blog
0
52
SHARES
573
VIEWS
Ad 1

पालघर : पालघर जिल्ह्यात पर्यटन विकासाच्या दृष्टीने व स्थानिक व्यवसायांना चालना मिळावी आणि रोजगार निर्मितीला संधी मिळावी यासाठी कोकण भूमी प्रतिष्ठान यांच्या वतीने तसेच जिल्हा प्रशासनाच्या सहयोगाने जिल्ह्यातील प्रसिद्ध शिरगाव पर्यटन या स्थळी ग्लोबल कोकण महोत्सव २०२६ या अंतर्गत १८ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत बीच फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तर कोकण ते तळकोकण मध्ये पहिल्यांदाच इतक्या भव्य स्वरूपात बीच फेस्टिवल आयोजित केला आहे.

कोकण सरस या उपक्रम या महोत्सवामध्ये संलग्न आकर्षण ठरणार असून या महोत्सवाच्या प्रदर्शनात ४०० हून अधिक स्थानिक उद्योजक सहभागी होणार आहेत. तसेच कोकण सरस उपक्रमांतर्गत पालघर जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक महिला बचत गट महिला सामील होणार आहेत त्यामुळे ग्रामीण उद्योजकांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पादनांना जागतिक स्तरावर ओळख मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
लोककलेचा महासंग्राम या उपक्रमाचा भव्य बीच फेस्टिवल मध्ये समावेश करण्यात आला असून या महोत्सवात दररोज सुमारे २०० स्थानिक कलावंत लोककला महोत्सवात सहभागी होणार आहेत. यामध्ये कोकणातील आदिवासी संस्कृती दर्शवणारे तारपा नृत्य, सिंधुदुर्गातील दशावतार, रत्नागिरीतील झाकडी नृत्य, कोळी नृत्य तसेच विविध पारंपारिक कला, लोक कला व लोकनृत्यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

शिरगावातील या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे कोळी, आगरी, वाडवळ, भंडारी,मालवणी, कोकणी खाद्य संस्कृतीचे विविध स्वाद भव्य फूड फेस्टिवलमध्ये अनुभवता येणार आहेत. त्या महोत्सवात पाचही दिवस राजा रयतेचा हे भव्य महानाट्य १५० कलावंताच्या सहभागाने सादर केले जाणार आहे.
समुद्रकिनाऱ्यावरच ग्लोबल कोकण टेंट व्हिलेज व पर्यटकांसाठी कॅम्पिंग सुविधा असे अनेक आकर्षक उपक्रम या महोत्सवात आयोजित करण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यातील पर्यटन, शेती, मत्स्य, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक संस्था या उपक्रमात सहभागी होत असून संपूर्ण महाराष्ट्र व देशभरातील पर्यटकांनी या भव्य सागरी महोत्सवात सहभागी व्हावे पालघर जिल्ह्याचा निसर्ग संस्कृती आणि पर्यटन अनुभवावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


समुद्रकिनाऱ्यावर पहिला मराठी चित्रपट महोत्सव

कोकणच्या समुद्र किनाऱ्यावर प्रथमच मराठी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. अलीकडच्या काळात कोकणात चित्रीत झालेले आणि लोकप्रिय ठरलेले कुर्ला टू वेंगुर्ला, एप्रिल मे आदेश यासारखे निवडक मराठी चित्रपट थेट समुद्राच्या वाळूवर बसून स्थानिक नागरिक व पर्यटकांना पाहता येणार आहेत यासाठी व्यवस्था देखील तशी करण्यात आली आहे.

Source: जिल्हा प्रतिनिधी श्री केविल पाटील
Via: Kevil
Tags: Milind ChuriPranay MhatreRahul thakur
Previous Post

बहिरेवाडीतील हभप आप्पा मोरे दाम्पत्यांचा अमृतमहोत्सवी सोहळा उत्साहात..

Next Post

अतिवृष्टीनंतर आता जंगली प्राण्यांचा कहर

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
13
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
25
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
28
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
13
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
33
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
6
Next Post
अतिवृष्टीनंतर आता जंगली प्राण्यांचा कहर

अतिवृष्टीनंतर आता जंगली प्राण्यांचा कहर

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In