• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

डोंबिवलीत उच्च रक्तदाबाच्या रुग्णांच्या जिवाशी खेळ; बनावट औषधांचे रॅकेट उघड

by
February 19, 2026
in Blog
0
डोंबिवलीत उच्च रक्तदाबाच्या रुग्णांच्या जिवाशी खेळ; बनावट औषधांचे रॅकेट उघड
0
SHARES
17
VIEWS
Ad 1

दोन वितरक गजाआड

कल्याण प्रतिनिधी – उच्च रक्तदाबावर वापरल्या जाणाऱ्या ‘टेल्मा एएम’ या नामांकित औषधाच्या बनावट गोळ्यांची विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डोंबिवली आणि मुंबई येथील दोन औषध वितरकांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

डोंबिवलीतील ‘श्री राम फार्मा’चा मालक पंकज उपाध्याय आणि मुंबईतील वितरक विवेक अजयकुमार राय (वय ३५, रा. कांदिवली) यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून नामांकित कंपनीच्या लेबल्ससह बनावट औषधांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.

एफडीएचा धक्कादायक खुलासा

अन्न व औषध प्रशासन विभाग (एफडीए) यांच्या तपासात या बनावट गोळ्या शरीरात उशिरा विरघळत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा गंभीर धोका संभवतो. या प्रकरणात बिहार कनेक्शनही समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले.

आठ लाखांहून अधिक किमतीचा साठा जप्त

२० जानेवारी रोजी एफडीएने छापा टाकून पंकज उपाध्याय याच्याकडून सुमारे ८ लाख ९४ हजार ४०० रुपये किंमतीच्या ‘टेल्मा एएम’ गोळ्यांच्या एकूण २७९५ स्ट्रीप जप्त केल्या. त्यानंतर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासात हे बनावट औषध विवेक राय याच्याकडून पुरवले जात असल्याचे स्पष्ट झाले. दोघांनी संगनमताने हा गुन्हा केल्याचा आरोप असून १६ फेब्रुवारी रोजी विवेक राय यालाही अटक करण्यात आली.

तपास सुरू

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश राळेभात व गुन्हे प्रकटीकरण पथक करीत आहे.

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या बनावट औषध रॅकेटमुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली असून नागरिकांनी औषधे खरेदी करताना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज जनतेच्या कल्याणासाठी सदैव तत्पर लोकनेते होते – महेंद्र ब्राह्मणवाडे

Next Post

आधी बंडखोरांवर कारवाई; नंतर महासभेची लगीनघाई

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
4
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
7
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
11
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
17
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
7
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
214
Next Post

आधी बंडखोरांवर कारवाई; नंतर महासभेची लगीनघाई

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In