मिरज येथील गुलाबराव पाटील मेमोरिअल ट्रस्ट येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सांगली आणि राष्ट्रीय कलामंच यांच्या वतीने आयोजित ‘FOLK प्रवाह’ या विभागस्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री ऍड आशिष शेलार यांच्या हस्ते झाले.या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थी मित्रांशी त्यांनी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गेल्या ७७ वर्षांपासून केवळ शिक्षणच नव्हे, तर राष्ट्रभक्ती आणि सांस्कृतिक मूल्यांचे संस्कार तरुणाईवर करण्याचे जे कार्य आहे ते खरंच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी यावेळी मनोगतात म्हणले यावेळी माजी मंत्री व मिरज विधानसभेचे आमदार सुरेश खाडे, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि गुलाबराव पाटील मेमोरिअल ट्रस्टचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रांत मंत्री अथर्व कुलकर्णी, महानगर अध्यक्ष सिद्धेश्वर जाधव, महानगर मंत्री अवनिश यादवाडे, कार्यक्रम प्रमुख पार्थ पाटील उपस्थित होते.











