• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मानवत पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात

by
March 11, 2026
in देश विदेश
0
मानवत पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात
0
SHARES
19
VIEWS

RelatedPosts

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

Ad 1

ललिता निर्वळ सभापती, सुरज काकडे उपसभापतीपदी बिनविरोध
परभणी /प्रतिनिधी : रमेश मुलगीर
मानवत पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ललिता उद्धवराव निर्वळ यांची तर उपसभापतीपदी सुरज सुंदरराव काकडे यांची सोमवारी (१० मार्च) दुपारी २ वाजता झालेल्या विशेष सभेत निवड करण्यात आली. या निवडीमुळे बराच कालावधीनंतर मानवत पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकहाती सत्ता मिळवली आहे. निवडणूक प्रक्रिया पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली.
सभापतीपदासाठी ललिता उद्धवराव निर्वळ तर उपसभापतीपदासाठी सुरज सुंदरराव काकडे यांचेच उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. निर्वळ या ताडोळेगाव पंचायत समिती गणातून निवडून आल्या असून काकडे हे पालोडी गणातून निवडून आलेले आहेत. दोघेही एकमेव उमेदवार असल्याने त्यांची निवड निश्चित झाली.
निवड जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी नवविनिर्वाचित सभापती व उपसभापतीचे जोरदार स्वागत केले. फटाक्यांच्या आतषबाजीने तहसील परिसर दुमदुमून गेला आणि कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
या प्रसंगी पंचायत समिती सदस्य उद्धवराव हरकाळे, ज्योती लक्ष्मण शिंदे, उर्मिला खांबे, शहाजूर खा पठाण, सरस्वती नाईक, प्रमिला शिवाजी उक्कळकर आदी सदस्य उपस्थित होते. तसेच आमदार राजेश विटेकर, बाजार समितीचे सभापती गंगाधरराव कदम, जिल्हा परिषद सदस्य दत्ताराव जाधव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुकुंदराव मगर, संतोषराव लाडाणे, गजानन घाटूळ यांनी नवविनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी गोपालराव सुरवसे, अमोल कदम, कुमार गुगाणे, बाबासाहेब अवचार, बाळासाहेब निर्वळ, शिवाजीराव वरखडे, लक्ष्मण शिंदे, विशाल यादव, सचिन पठाडे, माऊली फंड, हनुमान मस्के यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून अरुणा संगोवार यांनी काम पाहिले. त्यांना तहसीलदार पांडुरंग माचेवाड व गटविकास अधिकारी एस. आर. कांबळे यांनी सहकार्य केले.

Previous Post

वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करा -जिल्हाधिकाऱ्यांकडून यंत्रणांना सूचना

Next Post

समाजशास्त्र विषयातून समाजसेवा व करिअरच्या संधी : प्रा.बी.एम शेळके..

Related Posts

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
13
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
3
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
मानोली गावच्या ग्रामरोजगार सेवक हटवायला घेतले मतदान
देश विदेश

मानोली गावच्या ग्रामरोजगार सेवक हटवायला घेतले मतदान

March 19, 2026
5
Next Post

समाजशास्त्र विषयातून समाजसेवा व करिअरच्या संधी : प्रा.बी.एम शेळके..

ताज्या बातम्या

जळकोट शहरात भीम जयंतीचा जल्लोष; भव्य मिरवणूक व मोटारसायकल रॅलीने शहर दणाणले

April 15, 2026

जळकोट येथे फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त डॉ. संजय कलवले यांचा सत्कार

April 15, 2026
जळकोट शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

जळकोट शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In