• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रोपळे चौकात भीषण अपघात; भरधाव टिपरखाली युवक ठार, नागरिक संतप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 20, 2026
in Blog
0
रोपळे चौकात भीषण अपघात; भरधाव टिपरखाली युवक ठार, नागरिक संतप्त
0
SHARES
390
VIEWS
Ad 1

पंढरपूर-कुर्डूवाडी रोडवरील रोपळे चौकात भरधाव आणि ओव्हरलोड टिपरने भीषण अपघात घडवून मेढापूर येथील विजय पवार या तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात एका चारचाकी वाहनालाही जोरदार धडक बसली असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने एअरबॅग उघडल्याने चालकाचा जीव वाचला.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गौण खनिज मुरूम वाहतूक करणारा भरधाव टिपर (MH 13 AX 3840) रोपळे चौकातून जात असताना मोटारसायकलस्वार विजय पवार (MH 45 U 7539) यांना जोरदार धडक देत चिरडून गेला. अपघात इतका भीषण होता की तरुणाच्या शरीराचे तुकडे गोळा करून रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी पाठवावे लागले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून नातेवाईकांनी घटनास्थळी टाहो फोडला.

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अपघातानंतर टिपरने पंढरपूरहून कुर्डूवाडीच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी वाहनालाही (MH 14 EH 6089) धडक दिली. वाहनाचे मोठे नुकसान झाले असले तरी चालक बचावला.

घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला. “या मार्गावरून रोज भरधाव वेगाने वाळू व मुरूम वाहतूक करणारे टिपर धावत असतात. चौकाजवळ शाळा असून विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. येथे गतिरोधक बसवण्याची मागणी अनेकदा MSRDC अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले,” असा आरोप ग्रामस्थांनी केला.

नागरिकांच्या मते, चौकात गतिरोधक असता तर हा अपघात टाळता आला असता. या मार्गावर ओव्हरलोड वाहतूक आणि भरधाव वेगामुळे आढीव, बाभुळगाव आणि रोपळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शहाजी गोसावी, महेश रोकडे आणि भोसले साहेब करत असून संबंधित टिपर ताब्यात घेण्यात आला आहे.

दरम्यान, “वाळू आणि गौण खनिज माफियांवर कठोर कारवाई झाली नाही तर गावकरी आणि शालेय विद्यार्थ्यांसह तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

Previous Post

अकोल्यातील वाढत्या उष्णतेवर प्रशासन गप्प का? नागरिकांचा संतप्त सवाल

Next Post

दुघाळा येथे भीषण आग; शेतकरी दिवाकर पवार यांचा संसार जळून खाक

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
3
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
11
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
15
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
6
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
14
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
4
Next Post
दुघाळा येथे भीषण आग; शेतकरी दिवाकर पवार यांचा संसार जळून खाक

दुघाळा येथे भीषण आग; शेतकरी दिवाकर पवार यांचा संसार जळून खाक

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In