• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अमेरिकेतील विद्यापीठातून एम.एस. पदवी मिळवत कु. प्रतिक्षा किन्होळकर यांची यशस्वी झेप; बुलढाणा जिल्ह्याचा गौरव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 22, 2026
in Blog
0
अमेरिकेतील विद्यापीठातून एम.एस. पदवी मिळवत कु. प्रतिक्षा किन्होळकर यांची यशस्वी झेप; बुलढाणा जिल्ह्याचा गौरव
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

ग्रामीण भागातील मुली शिक्षणाच्या जोरावर जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करत असल्याचे प्रेरणादायी उदाहरण बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील किन्होळा गावातील कु. प्रतिक्षा किन्होळकर हिने घालून दिले आहे. प्रसिद्ध साहित्यिक तथा कादंबरीकार सुभाष किन्होळकर यांची कन्या असलेल्या प्रतिक्षाने अमेरिकेतील टेक्सॉस-डलास येथील नामांकित विद्यापीठातून एम.एस. (मास्टर ऑफ सायन्स इन सायबर सेक्युरिटी) ही पदवी उत्कृष्ट गुणांनी संपादन केली आहे.

१९ मे रोजी टेक्सॉस युनिव्हर्सिटी, डलास (अमेरिका) येथे झालेल्या पदवीप्रदान समारंभात मान्यवरांच्या हस्ते तिला पदवी बहाल करण्यात आली. तिच्या या यशामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

RelatedPosts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

प्रतिक्षा किन्होळकर हिचे बालपण अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबात गेले. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही तिच्या आई-वडिलांनी मुलीच्या शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. तिच्यातील जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर प्रतिक्षाने सातासमुद्रापार यशाची पताका फडकावली आहे.

तिचे प्राथमिक शिक्षण बुलढाण्यातील महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक शाळेत, तर माध्यमिक शिक्षण भारत विद्यालयात झाले. त्यानंतर पुणे येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातून तिने पॉलिटेक्निक (कॉम्प्युटर) शिक्षण पूर्ण केले. पुढे ज्ञानबा मोझे कॉलेजमधून बी.ई. (कॉम्प्युटर) पदवी संपादन केली.

शिक्षणानंतर तिने दोन वर्षे कॅपजेमिनी कंपनीत सहायक अभियंता म्हणून काम केले. मात्र उच्च शिक्षणाची जिद्द कायम ठेवत तिने अमेरिकेतील टेक्सॉस-डलास विद्यापीठात प्रवेश मिळवला आणि एम.एस. पदवी यशस्वीरीत्या पूर्ण केली.

प्रतिक्षाच्या या यशामागे तिचे आई-वडील तसेच भागवत इंगोले, कविधा इंगोले, नितीन इंगोले, कविता इंगोले, अभयसिंग थोरात, मुकुंद वैराळकर, प्रफुल्ल गार्वे, प्रीती थोरात, सौरभ किन्होळकर आणि प्रतीक गवळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रतिक्षा किन्होळकर हिची यशोगाथा प्रेरणादायी ठरत असून तिच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous Post

समीर शेख बीडचे नवे अप्पर पोलीस अधीक्षक

Next Post

सोमनाळा फाट्याजवळ भीषण अपघात; मारेगाव येथील सचिन देवाळकर यांचा मृत्यू

Related Posts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
7
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
198
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
10
दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर
Blog

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

October 5, 2026
46
Next Post
सोमनाळा फाट्याजवळ भीषण अपघात; मारेगाव येथील सचिन देवाळकर यांचा मृत्यू

सोमनाळा फाट्याजवळ भीषण अपघात; मारेगाव येथील सचिन देवाळकर यांचा मृत्यू

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In