• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

झरे-२ येथे ख्रिस्ती बांधवांचे उपोषण चौथ्या दिवशीही सुरू; उद्यापासून महिलांचे साखळी उपोषण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 3, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

प्रशासनाला आंदोलनाचा इशारा

दोडामार्ग

RelatedPosts

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

झरे-२ येथील ख्रिस्ती बांधवांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण आज चौथ्या दिवशीही कायम असून आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. वारंवार आश्वासने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या शनिवार, दि. ४ जुलै २०२६ पासून वाडीतील महिलांनी साखळी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

ख्रिस्ती बांधवांच्या प्रमुख मागण्यांमध्ये ख्रिश्चन वाडी ते झरे-२ दरम्यानचा पुनर्वसन विभागाचा जुना रस्ता तातडीने खुला करणे, पुनर्वसन परिसरातील कथित बेकायदेशीर जमीन व्यवहारांची सखोल चौकशी करणे, हक्काची नुकसानभरपाई देणे तसेच परिसरातील अतिक्रमणे हटविणे या मागण्यांचा समावेश आहे. मात्र, प्रशासनाकडून केवळ आश्वासनांची पूर्तता होत असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

चार दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणामुळे उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. तरीदेखील संबंधित प्रांत अधिकाऱ्यांनी अद्याप आंदोलनस्थळी भेट दिलेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या या भूमिकेबद्दल ख्रिस्ती बांधवांसह परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. उद्यापासून महिलादेखील आंदोलनात सहभागी होत साखळी उपोषण करणार असल्याने आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास किंवा उपोषणकर्त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देणारे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे. या प्रकरणात प्रशासनाने तातडीने मध्यस्थी करून तोडगा काढावा, अशी मागणी झरे-२ येथील ख्रिस्ती बांधव व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Tags: Dipak Jadhav
Previous Post

दोडामार्ग तालुक्यात दुःखद घटना; परमे येथील ३२ वर्षीय तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू

Next Post

धामणी येथील रेल्वे ब्रिजखालील रस्ता चिखलमय; नागरिकांचा जीव धोक्यात

Related Posts

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान
Blog

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
2
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही
Blog

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026
8
Blog

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026
16
Blog

विद्या मंदिर गुडाळवाडी येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

August 17, 2026
50
ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचा जागतिक विश्वविक्रम
Blog

ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचा जागतिक विश्वविक्रम

August 17, 2026
26
नागेश्वराच्या पावनभूमीत नागपंचमी निमित्त रंगणार कुस्त्यांचा थरार…
Blog

नागेश्वराच्या पावनभूमीत नागपंचमी निमित्त रंगणार कुस्त्यांचा थरार…

August 17, 2026
9
Next Post

धामणी येथील रेल्वे ब्रिजखालील रस्ता चिखलमय; नागरिकांचा जीव धोक्यात

ताज्या बातम्या

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In