• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वारणाली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या खासगीकरणाचा डाव? नागरिकांमध्ये संतापाची लाट

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 6, 2026
in Blog
0
0
SHARES
17
VIEWS
Ad 1

सांगली | प्रतिनिधी

सांगली महानगरपालिकेने वारणाली येथे उभारलेल्या बहुप्रतिक्षित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर तब्बल ३० वर्षांसाठी खासगी संस्थेकडे संचालन सोपविण्याचा प्रस्ताव तयार केल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रस्ताव महासभेपुढे मांडला जाणार असल्याचे समजत असून, यामुळे शहरात राजकीय तसेच सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

RelatedPosts

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने वारणाली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली होती. सुमारे १५ कोटी रुपये खर्च करून रुग्णालयाची भव्य इमारत, आवश्यक पायाभूत सुविधा आणि काही अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

मात्र, आता या रुग्णालयाचे संचालन महानगरपालिकेने स्वतः करण्याऐवजी खासगी संस्थेकडे देण्याची तयारी सुरू असल्याचे समोर आले आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, महानगरपालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक सुमारे १,६१६ कोटी रुपये असले तरी रुग्णालय चालविण्यासाठी दरवर्षी अंदाजे ७.१४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च आर्थिकदृष्ट्या मोठा भार ठरू शकतो, त्यामुळे PPP मॉडेलचा पर्याय विचाराधीन असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, या प्रस्तावावर नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेले रुग्णालय खासगी संस्थेकडे दिल्यास सर्वसामान्य नागरिकांना उपचारांसाठी जादा शुल्क आकारले जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. आरोग्यसेवा हा नागरिकांचा मूलभूत हक्क असून त्याचे व्यापारीकरण होऊ नये, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या निर्णयामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, रुग्णालयाच्या खासगीकरणाच्या विरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण होत आहे. आता हा प्रस्ताव महासभेत मंजूर होतो की त्यावर आक्षेप घेतले जातात, याकडे सांगलीकरांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

पूरसंकटात नागरिकांच्या सुरक्षेसाठी दापोली पोलीस सज्ज; जनजागृतीसह 24×7 मदतीचे आवाहन

Next Post

खंडोबाचीवाडीचे माजी सरपंच अंकुश लकडे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

Related Posts

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित
Blog

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

October 4, 2026
0
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात
Blog

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026
0
वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ
Blog

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

October 4, 2026
5
गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात
Blog

गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात

October 4, 2026
23
Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
21
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
33
Next Post

खंडोबाचीवाडीचे माजी सरपंच अंकुश लकडे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

ताज्या बातम्या

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

October 4, 2026
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026
वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In