• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बिरसा फायटर्सचा दणका; पिंपर्डे ग्रामसेविका दिपाली उगलमुगले यांचा जाहीर माफीनामा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 6, 2026
in Blog
0
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

निलंबनाच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर ग्रामविकास अधिकाऱ्यांची लेखी माफी

धडगाव प्रतिनिधी :

शहादा तालुक्यातील पिंपर्डे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका तथा ग्रामविकास अधिकारी श्रीमती दिपाली अरविंद उगलमुगले यांच्या विरोधात बिरसा फायटर्स संघटना व ग्रामस्थ आक्रमक झाले असून, त्यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. यानंतर अखेर ग्रामसेविका दिपाली उगलमुगले यांनी ग्रामपंचायत कर्मचारी दिनेश वाघ यांची सर्वांसमोर लेखी माफी मागितली आहे.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

गेल्या तीन महिन्यांपासून ग्रामपंचायत कार्यालयात अनुपस्थित राहणे, गावकऱ्यांचे प्रश्न न सोडवणे, कर्मचाऱ्यांशी उद्धट वर्तन करणे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी श्री. दिनेश लोटन वाघ यांना धमकी देऊन गैरवर्तन केल्याचा आरोप ग्रामसेविका दिपाली उगलमुगले यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी बिरसा फायटर्स संघटनेने गटविकास अधिकारी, पंचायत समिती शहादा यांना निवेदन देत त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली होती.

तक्रारीनुसार, “तु समोर भेट फक्त आता दाखवते तुला, तू विचार करून ठेव आता,” असा धमकीचा संदेश ग्रामसेविका यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच ग्रामस्थांशी आणि कर्मचाऱ्यांशी अपमानास्पद भाषेत बोलून धमकी देत असल्याचा आरोप उपसरपंच घनश्याम मराठे यांनी केला होता. या प्रकारामुळे ग्रामस्थ आणि बिरसा फायटर्स संघटना आक्रमक झाली होती.

दरम्यान, वाढत्या वादानंतर ग्रामसेविका दिपाली उगलमुगले यांनी लेखी माफीनामा सादर केला. माफीनाम्यात त्यांनी नमूद केले की, “ग्रामपंचायत कर्मचारी (शिपाई) यांना माझ्याकडून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर अपशब्द, बदनामीकारक आणि अपमानास्पद शब्द वापरण्यात आले. त्या संदर्भात सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि उपसरपंच यांच्या समक्ष मी दिनेश लोटन वाघ यांची जाहीर माफी मागत आहे. यापुढे अशी कोणतीही घटना घडणार नाही, याची दक्षता घेण्याचे आश्वासन देते.”

हा लेखी माफीनामा ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत तक्रारदार दिनेश वाघ यांना देण्यात आला.

Previous Post

जमजम कॉलनी परिसरातील पारवा गेट ते कवडगाव रोडची तातडीने दुरुस्ती व गटार सफाईची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची महापौरांकडे मागणी

Next Post

प्रशासनाची वाट न पाहता समाजसेवकांनीच कुदळी-फावडे घेऊन खारपाडा-समर्थनगर रोडवरील पाण्याचा प्रश्न सोडवला

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
1
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
8
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
198
Next Post

प्रशासनाची वाट न पाहता समाजसेवकांनीच कुदळी-फावडे घेऊन खारपाडा-समर्थनगर रोडवरील पाण्याचा प्रश्न सोडवला

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In