• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

31 महिन्यांचा कोरोना भत्ता थकीत; आशा व गटप्रवर्तकांचे चामोर्शीत आंदोलन, प्रशासनाच्या लेखी आदेशानंतर आंदोलन स्थगित

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 9, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

चामोर्शी | प्रतिनिधी

कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता सेवा बजावणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना ग्रामपंचायत स्तरावरील तब्बल 31 महिन्यांचा कोरोना प्रोत्साहन भत्ता अद्याप न मिळाल्याच्या निषेधार्थ आयटकच्या नेतृत्वाखाली चामोर्शी येथे पंचायत समिती, तहसील कार्यालय आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयावर धडक आंदोलन करण्यात आले. प्रशासनाकडून लेखी आदेश देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

RelatedPosts

कोसारा गावात अवैध दारू विक्री सुरू? प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

फलटण नगरपरिषदेत बचत गट उत्पादनांच्या आठवडी बाजाराचा शुभारंभ

लोहा कृषी विभागाचा भोंगळ कारभार? फळबाग योजनेच्या लाभाबाबत चौकशीची मागणी

आयटकचे राज्य सचिव कॉ. विनोद झोडगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात विविध मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, तहसीलदार प्रशांत घोरुडे, अन्न पुरवठा अधिकारी प्रशांत अंबादे आणि तालुका आरोग्य अधिकारी महेंद्र पेद्दाला यांना देण्यात आले.

निवेदनात कोरोना काळातील ग्रामपंचायत व नगरपंचायत स्तरावरील 31 महिन्यांचा दरमहा एक हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता तातडीने अदा करावा, सरकारी कर्मचारी समजून बंद करण्यात आलेली आशा व गटप्रवर्तकांची राशन कार्डे पूर्ववत सुरू करावीत, निवडणूक संदर्भातील बीएलओ व एसआयआरची अतिरिक्त कामे थांबवावीत, तसेच ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या सचिव पदाचे दिलेले सामूहिक राजीनामे स्वीकारावेत, अशी मागणी करण्यात आली.

आंदोलनानंतर गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी संबंधित ग्रामपंचायतींना कोरोना प्रोत्साहन भत्ता अदा करण्याबाबत लेखी आदेश काढल्याची माहिती दिली. तसेच तहसीलदार प्रशांत घोरुडे आणि अन्न पुरवठा अधिकारी प्रशांत अंबादे यांनी बंद करण्यात आलेली राशन कार्डे पूर्ववत सुरू करण्याचे आश्वासन दिले.

या आंदोलनात आयटकचे राज्य सचिव कॉ. विनोद झोडगे पाटील, जिल्हा सचिव कॉ. सरिता नैताम, तालुका सचिव किरण गांधारे, गोपिका धूर्वे, निर्मला सोनटक्के, सोनिया चांदेकर, संगीता गुरनुले, पुष्पा बोटावार यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक सहभागी झाले.

Previous Post

तळोधी मोकासा उपसा सिंचन योजनेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; कोट्यवधींच्या प्रकल्पात सुरक्षा रक्षकांचा अभाव

Next Post

शासकीय आयटीआय चामोर्शीच्या नावाने बनावट शिष्यवृत्ती घोटाळा; ₹2.93 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

Related Posts

Blog

कोसारा गावात अवैध दारू विक्री सुरू? प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

August 23, 2026
4
Blog

फलटण नगरपरिषदेत बचत गट उत्पादनांच्या आठवडी बाजाराचा शुभारंभ

August 23, 2026
18
Blog

लोहा कृषी विभागाचा भोंगळ कारभार? फळबाग योजनेच्या लाभाबाबत चौकशीची मागणी

August 23, 2026
7
Blog

विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च करा; अवैध धंद्यांची माहिती तातडीने द्या : पीआय राहुल सूर्यतळ

August 23, 2026
3
Blog

अंध विद्यार्थ्यांच्या सहवासात अनिव्रतचा वाढदिवस उत्साहात साजरा

August 23, 2026
13
Blog

मशिनरी खरेदीच्या व्यवहारात महिलेची ६.३५ कोटींची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 23, 2026
1
Next Post

शासकीय आयटीआय चामोर्शीच्या नावाने बनावट शिष्यवृत्ती घोटाळा; ₹2.93 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

कोसारा गावात अवैध दारू विक्री सुरू? प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

August 23, 2026

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In