• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शासकीय आयटीआय चामोर्शीच्या नावाने बनावट शिष्यवृत्ती घोटाळा; ₹2.93 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 9, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

चामोर्शी | प्रतिनिधी

शासकीय आदिवासी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) चामोर्शीच्या नावाचा गैरवापर करून केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेत ₹2 लाख 93 हजार 400 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RelatedPosts

अंबाजोगाईला बीएस्सी नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी; ‘स्वाराती’च्या जीएनएम विद्यालयाचे १०० जागांच्या महाविद्यालयात श्रेणीवर्धन

मुसळधार पावसाचा फटका; शिवनेरी किल्ल्याचा पदपथ मार्ग बंद, पर्यटकांना प्रवेशबंदी

कन्यारत्नाच्या जन्मानिमित्त वैष्णवी गिर्ह यांचा गौरव; सैनिक शेतकरी वेलफेअर फाऊंडेशनकडून ₹5 हजारांचा धनादेश

याप्रकरणी सहसंचालक, उच्च शिक्षण नागपूर विभागाचे प्रशासन अधिकारी शंकर रामजी बर्गे (वय 49) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून आदित्य मेंहदळे (हेड ऑफ इन्स्टिट्यूट – HOI) आणि रागार कल्वी निलयम (इन्स्टिट्यूट नोडल ऑफिसर – INO) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2021-22 आणि 2022-23 या शैक्षणिक वर्षांमध्ये आरोपींनी National Scholarship Portal वर शासकीय आयटीआय, चामोर्शीचा UDISE कोड वापरून बनावट युजर आयडी तयार केला. त्यानंतर स्वतःला हेड ऑफ इन्स्टिट्यूट (HOI) आणि इन्स्टिट्यूट नोडल ऑफिसर (INO) म्हणून दाखवत 22 बनावट विद्यार्थ्यांच्या नावाने शिष्यवृत्ती अर्ज सादर केले.

या बनावट अर्जांच्या आधारे शासनाकडून ₹2,93,400 इतकी शिष्यवृत्तीची रक्कम प्राप्त करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

संबंधित विभागामार्फत प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आल्याने गुन्हा नोंद होण्यास विलंब झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी गुन्हा क्रमांक 59/2026 हा 6 जुलै 2026 रोजी रात्री 8.23 वाजता चामोर्शी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक डोंब करीत आहेत. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Previous Post

31 महिन्यांचा कोरोना भत्ता थकीत; आशा व गटप्रवर्तकांचे चामोर्शीत आंदोलन, प्रशासनाच्या लेखी आदेशानंतर आंदोलन स्थगित

Next Post

श्री क्षेत्र किलेमच्छिंद्रगड येथून १४ जुलै रोजी आषाढी वारी पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान

Related Posts

Blog

अंबाजोगाईला बीएस्सी नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी; ‘स्वाराती’च्या जीएनएम विद्यालयाचे १०० जागांच्या महाविद्यालयात श्रेणीवर्धन

July 9, 2026
0
Blog

मुसळधार पावसाचा फटका; शिवनेरी किल्ल्याचा पदपथ मार्ग बंद, पर्यटकांना प्रवेशबंदी

July 9, 2026
4
Blog

कन्यारत्नाच्या जन्मानिमित्त वैष्णवी गिर्ह यांचा गौरव; सैनिक शेतकरी वेलफेअर फाऊंडेशनकडून ₹5 हजारांचा धनादेश

July 9, 2026
1
Blog

भिलवडीत पद्मश्री प्रा. एच. सी. वर्मा यांचे व्याख्यान; विद्यार्थी व शिक्षकांना भौतिकशास्त्राची ज्ञानगंगा

July 9, 2026
2
Blog

नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ; रामकुंड परिसराची मंत्र्यांकडून पाहणी

July 9, 2026
1
Blog

नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून १५,२४८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

July 9, 2026
2
Next Post

श्री क्षेत्र किलेमच्छिंद्रगड येथून १४ जुलै रोजी आषाढी वारी पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान

ताज्या बातम्या

अंबाजोगाईला बीएस्सी नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी; ‘स्वाराती’च्या जीएनएम विद्यालयाचे १०० जागांच्या महाविद्यालयात श्रेणीवर्धन

July 9, 2026

मुसळधार पावसाचा फटका; शिवनेरी किल्ल्याचा पदपथ मार्ग बंद, पर्यटकांना प्रवेशबंदी

July 9, 2026

कन्यारत्नाच्या जन्मानिमित्त वैष्णवी गिर्ह यांचा गौरव; सैनिक शेतकरी वेलफेअर फाऊंडेशनकडून ₹5 हजारांचा धनादेश

July 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In