• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सांगळूद गावातील वीज समस्येला अखेर दिलासा; शिवसेनेच्या पाठपुराव्याने रखडलेल्या कामाला सुरुवात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 9, 2026
in Blog
0
0
SHARES
53
VIEWS
Ad 1
Ad 1

अकोला | प्रतिनिधी

अकोला तालुक्यातील सांगळूद गावातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा सामना करावा लागत होता. अखेर शिवसेनेच्या पाठपुराव्यानंतर रखडलेल्या कामाला सुरुवात झाल्याने गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

RelatedPosts

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय

तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव

अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात

काही महिन्यांपूर्वी आपातापा–अनकवाडी दरम्यान नवीन वीजवाहिनी टाकण्यात आली होती. मात्र, हायटेन्शन लाईनमुळे खालील वीजतारा काढून टाकण्यात आल्याने त्या भागातील वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यानंतर जुन्या लाईनवरून वीजपुरवठा सुरू ठेवण्यात आला. मात्र, वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना तीन ते चार तास वीजेशिवाय राहावे लागत होते.

या समस्येबाबत प्रज्वल बोंद्रे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपालभाऊ दातकर यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर दातकर यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता चांभरे आणि उपकार्यकारी अभियंता अग्रवाल यांची भेट घेऊन समस्या मांडली.

चर्चेदरम्यान अनकवाडीहून आलेल्या लाईनवरील बॅकसाईड हायटेन्शन क्रॉसिंगसाठी अंडरग्राऊंड केबल टाकल्यास सांगळूद व धोतर्डी गावांचा वीजपुरवठा सुरळीत होऊ शकतो, असे स्पष्ट झाले. संबंधित कंत्राटदाराने करारनाम्यात अंडरग्राऊंड केबलचा समावेश नसल्याचे सांगितल्यानंतर शिवसेनेने विद्युत विभागाकडे केबल उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यानुसार महावितरणने तातडीने केबल उपलब्ध करून दिली असून कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

यावेळी कार्यकारी अभियंत्यांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान शिवसेना शहरप्रमुख राहुल कराळे, युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अभयदादा खुमकर, शिवसेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर गावंडे तसेच शिवसेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख प्रज्वल बोंद्रे उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

पालखी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज; लोणी काळभोर व उरुळी कांचन येथील आठवडी बाजार राहणार बंद

Next Post

NH-965G वरील जीवघेण्या त्रुटी तातडीने दूर करा; अन्यथा १६ जुलैला ‘रस्ता रोको’ आंदोलन – शिवसेनेचा NHAI ला इशारा

Related Posts

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय
Blog

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय

October 8, 2026
7
तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव
Blog

तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव

October 8, 2026
6
अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात
Blog

अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात

October 8, 2026
3
अष्टविनायक महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा सवाल
Blog

अष्टविनायक महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा सवाल

October 8, 2026
6
Blog

📢 मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्ज

October 8, 2026
6
Blog

उसनवारीच्या पैस्याने विहीर उभी केली,मजुरी मात्र दोन वर्षा पासून गायब;मरेगाचा कारभार म्हणे,’तोंड दाबून बुक्क्यांचा मार…!’

October 8, 2026
9
Next Post

NH-965G वरील जीवघेण्या त्रुटी तातडीने दूर करा; अन्यथा १६ जुलैला 'रस्ता रोको' आंदोलन – शिवसेनेचा NHAI ला इशारा

ताज्या बातम्या

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय

October 8, 2026
तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव

तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव

October 8, 2026
अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात

अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In