• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

NH-965G वरील जीवघेण्या त्रुटी तातडीने दूर करा; अन्यथा १६ जुलैला ‘रस्ता रोको’ आंदोलन – शिवसेनेचा NHAI ला इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 9, 2026
in Blog
0
0
SHARES
25
VIEWS
Ad 1
Ad 1

जत | प्रतिनिधी

मौजे शेगाव (ता. जत) येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH-965G वरील अपघातप्रवण परिस्थितीबाबत शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने न केल्यास १६ जुलै २०२६ रोजी तीव्र ‘रस्ता रोको’ आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

RelatedPosts

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय

तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव

अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात

शिवसेना जत तालुका प्रमुख तथा शिवसेना वैद्यकीय सहाय्यता कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे पदाधिकारी दिपक तुकाराम बुरुटे यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) पंढरपूरचे प्रकल्प संचालक यांना यासंदर्भात सविस्तर निवेदन दिले आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, ‘ओम साई प्रतिष्ठान, शेगाव’ या सामाजिक संस्थेने १ जानेवारी २०२६ रोजी ई-मेलद्वारे महामार्गावरील अपूर्ण कामे, चुकीची रचना आणि वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत तक्रार केली होती. मात्र, तब्बल सहा महिने उलटूनही NHAI प्रशासन आणि संबंधित कंत्राटदाराने कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शेगाव परिसरातील महामार्गावर जीवघेणे वळण, गतिरोधक, दिशादर्शक फलक, वेगमर्यादा दर्शविणारे फलक आणि इतर आवश्यक सुरक्षा उपाययोजनांचा अभाव असल्याने वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला असून वारंवार अपघात घडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिपक बुरुटे यांनी प्रशासनाला १५ जुलै २०२६ पर्यंत महामार्गावरील सर्व आवश्यक सुरक्षा उपाययोजना पूर्ण करण्याची अंतिम मुदत दिली आहे. या कालावधीत कामाला सुरुवात न झाल्यास १६ जुलै २०२६ रोजी शेगाव येथे शिवसेनेच्या वतीने तीव्र ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात येईल. प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

तसेच आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी NHAI प्रशासन आणि संबंधित कंत्राटदाराची राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

या निवेदनाच्या प्रती उपजिल्हाधिकारी, जत, पोलीस निरीक्षक, जत पोलीस ठाणे तसेच National Highway PWD, जत यांनाही पाठविण्यात आल्या असून, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे.

महामार्गावरील सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेगाव परिसरातील नागरिकांनी केली असून, प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Ad 1
Previous Post

सांगळूद गावातील वीज समस्येला अखेर दिलासा; शिवसेनेच्या पाठपुराव्याने रखडलेल्या कामाला सुरुवात

Next Post

कुकडीतून विसापूर धरणात पाणी सोडण्याचा निर्णय; आ. विक्रम पाचपुते यांच्या पाठपुराव्याला यश

Related Posts

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय
Blog

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय

October 8, 2026
7
तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव
Blog

तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव

October 8, 2026
6
अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात
Blog

अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात

October 8, 2026
3
अष्टविनायक महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा सवाल
Blog

अष्टविनायक महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा सवाल

October 8, 2026
6
Blog

📢 मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्ज

October 8, 2026
6
Blog

उसनवारीच्या पैस्याने विहीर उभी केली,मजुरी मात्र दोन वर्षा पासून गायब;मरेगाचा कारभार म्हणे,’तोंड दाबून बुक्क्यांचा मार…!’

October 8, 2026
9
Next Post

कुकडीतून विसापूर धरणात पाणी सोडण्याचा निर्णय; आ. विक्रम पाचपुते यांच्या पाठपुराव्याला यश

ताज्या बातम्या

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय

October 8, 2026
तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव

तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव

October 8, 2026
अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात

अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In