• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रायगड एलसीबीचा गुटखा माफियांवर धडक प्रहार; पनवेलमध्ये ₹८८,९६८ चा प्रतिबंधित विमल गुटखा जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 11, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रतिनिधी :

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

रायगड जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने प्रतिबंधित गुटखा विक्रेत्यांविरोधात धडक कारवाई करत पनवेल तालुक्यातील भोकरपाडा येथील एका किराणा दुकानावर छापा टाकून ₹८८,९६८ किमतीचा केशरयुक्त विमल पान मसाला (गुटखा) जप्त केला. या प्रकरणी दोघांविरुद्ध रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवार (दि. ९ जुलै २०२६) रोजी एलसीबीचे सहाय्यक फौजदार संदीप पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने भोकरपाडा येथील एका किराणा दुकानावर धाड टाकली. कारवाईदरम्यान शासनाने प्रतिबंधित केलेला केशरयुक्त विमल पान मसाला विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ ₹८८,९६८ किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी नितेश ज्ञानेश्वर पाटील (वय ३०, रा. भोकरपाडा, ता. पनवेल) आणि दिनेश मकीजा (रा. बदलापूर) यांच्याविरुद्ध रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २७४, २७५, २२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ आणि संबंधित नियमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, सहाय्यक फौजदार संदीप पाटील, पोलीस हवालदार रवी मुंडे, शरद फरांदे, रणजितसिंह खराडे तसेच पोलीस शिपाई प्रदीप खरात यांनी सहभाग घेतला.

कारवाईनंतर आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी रसायनी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.

प्रतिबंधित गुटख्याची विक्री व साठवणूक करणाऱ्यांविरोधात रायगड एलसीबीने पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले असून, अशा बेकायदेशीर व्यवसायांवर पुढेही सातत्याने कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Ad 1
Previous Post

सासवणे ग्रामपंचायतीकडून अंतर्गत रस्त्यांकडे दुर्लक्ष; खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त

Next Post

पिशोर पोलिसांचा दणका; अवैध दारू व मटका अड्ड्यांवर धाडी, सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
6
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
10
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post
पिशोर पोलिसांचा दणका; अवैध दारू व मटका अड्ड्यांवर धाडी, सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त

पिशोर पोलिसांचा दणका; अवैध दारू व मटका अड्ड्यांवर धाडी, सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In