• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पिशोर पोलिसांचा दणका; अवैध दारू व मटका अड्ड्यांवर धाडी, सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 11, 2026
in Blog
0
पिशोर पोलिसांचा दणका; अवैध दारू व मटका अड्ड्यांवर धाडी, सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
6
VIEWS
Ad 1
Ad 1

कन्नड | प्रतिनिधी :

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

कन्नड तालुक्यातील पिशोर परिसरात अवैध धंद्यांविरोधात पिशोर पोलिसांनी धडक मोहीम राबवत अवैध दारूविक्रेते आणि मटका चालकांवर कारवाई केली. गुरुवार (दि. ९ जुलै) रोजी झालेल्या या विशेष मोहिमेत पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण ₹२ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी विविध पथकांच्या माध्यमातून एकाच दिवशी पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. पिशोर बाजारतळ येथे प्रतिबंधित देशी दारूची विक्री करणाऱ्यावर कारवाई करत ४८ सीलबंद देशी दारूच्या बाटल्या आणि एक दुचाकी असा ₹७५,७६० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चिंचोली (ली.) फाटा येथील नवीन बसस्थानकासमोर सुरू असलेल्या ‘मिलन कल्याण’ मटका अड्ड्यावर छापा टाकून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईत ₹२,२४० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

घाटशेंद्रा फाटा येथे देशी दारूची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करत २०० सीलबंद देशी दारूच्या बाटल्या आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली. या कारवाईत ₹१ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तसेच धामणी शिवारात हातभट्टी दारूच्या दोन अड्ड्यांवर धाडी टाकून ५० लिटर तयार हातभट्टी दारू आणि ४८० लिटर रसायन नष्ट करण्यात आले. या कारवाईत ₹३३ हजारांचे नुकसान अवैध व्यवसायिकांना झाले.

ही मोहीम पोलीस अधीक्षक प्रकाश भा. जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि सहायक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पिशोर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

अवैध दारूविक्री, जुगार आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असून, अशा धंद्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पिशोर पोलिसांनी दिला आहे.

Ad 1
Tags: Gautam Hiwrale
Previous Post

रायगड एलसीबीचा गुटखा माफियांवर धडक प्रहार; पनवेलमध्ये ₹८८,९६८ चा प्रतिबंधित विमल गुटखा जप्त

Next Post

शेलगाव देशमुख येथे नायब तहसीलदारांची अचानक भेट; बीएलओंना गणना पत्रकांचे शंभर टक्के वितरणाचे निर्देश

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
7
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
11
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
10
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
31
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post

शेलगाव देशमुख येथे नायब तहसीलदारांची अचानक भेट; बीएलओंना गणना पत्रकांचे शंभर टक्के वितरणाचे निर्देश

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In