• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, माकणी येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 11, 2026
in Blog
0
0
SHARES
56
VIEWS
Ad 1
Ad 1

धाराशिव | प्रतिनिधी

दि. १० जुलै २०२६ रोजी भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, माकणी येथे एसएससी व एचएससी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी २०२६ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना सन्मानपत्र, ट्रॉफी, मेडल, चांदीचे नाणे तसेच एकूण ₹३५ हजारांची रोख रक्कम विभागून देत गौरविण्यात आले.

RelatedPosts

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

कार्यक्रमाच्या प्रारंभी लोहारा-उमरगा तालुक्यातील शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये द्वितीय क्रमांक मिळविलेल्या कु. गायत्री मल्लीनाथ हुडगे हिचा विशेष सत्कार करण्यात आला.

यानंतर आदर्श विद्यार्थीनी कु. वैष्णवी हणमंत क्षीरसागर हिने लोहारा तालुक्यात एसएससी बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल तसेच मराठी विषयात प्रथम आल्याबद्दल तिचा गौरव करण्यात आला. प्रशालेतून कु. सायली भास्कर सुरवसे हिने द्वितीय, तर चि. संकेत भास्कर सुरवसे याने तृतीय क्रमांक पटकावला. संकेत सुरवसे याने हिंदी विषयातही प्रथम क्रमांक मिळविला. तसेच चि. ऋषिकेश नागनाथ पवार याने गणित विषयात प्रथम, चि. प्रतीक बाळासाहेब मुसांडे याने इंग्रजी विषयात प्रथम, तर चि. अनिकेत कदम याने इतिहास-भूगोल विषयात प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समिती सदस्य सुधाकर दाजी आलमले होते. प्रमुख पाहुणे म्हणून दयानंद महाविद्यालय, लातूरचे प्राचार्य प्रशांत मंडलिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य गुंजोटे यांनी केले.

प्रमुख पाहुणे प्राचार्य प्रशांत मंडलिक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोबाईलपासून योग्य अंतर ठेवून नियोजनपूर्वक अभ्यास करण्याचा सल्ला दिला. तसेच, “आपल्या गुणवत्तेचा उपयोग समाज आणि मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी करा. आकाशाला गवसणी घालताना पाय मात्र नेहमी जमिनीवरच ठेवा,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.

यावेळी माकणी गावचे उपसरपंच फुलचंद आळंगे, शालेय समिती सदस्य भागवतराव तात्या आलमले, तुकाराम समुद्रवाने (आबा), शिवाजीराव जावळे (आण्णा), तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पंडितदादा ढोणे, बक्षीसदाते पंडितराव साठे, अरुण नरसाळे, मनोज हुडगे, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच पत्रकार सदाशिव जाधव व आदम पठाण उपस्थित होते. यावेळी पालक व पत्रकारांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक शिंदे यांनी केले, तर बनसोडे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Ad 1
Previous Post

टाईनी हार्ट प्री स्कूलमध्ये पालखी सोहळा उत्साहात; चिमुकल्यांनी अनुभवली वारकरी परंपरा

Next Post

श्रीसंत गजानन महाराजांच्या पालखीचे अंबाजोगाईत भक्तीमय स्वागत; जयघोषाने शहर दुमदुमले

Related Posts

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव
Blog

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

October 13, 2026
12
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..
Blog

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
8
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..
Blog

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

October 13, 2026
17
Blog

लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावर: ‘वोट चोरी’विरोधात घणसोलीत मनसेचा एल्गार; भव्य निदर्शने आणि स्वाक्षरी मोहीम संपन्न!

October 13, 2026
11
Blog

बँक कर्ज मागणीसाठी वापरा जण समर्थ पोर्टल.

October 13, 2026
18
Blog

कचरे से प्यार और इंसानी जान की बेकद्री: क्या यही आज की दुनिया की सच्चाई है?

October 13, 2026
4
Next Post

श्रीसंत गजानन महाराजांच्या पालखीचे अंबाजोगाईत भक्तीमय स्वागत; जयघोषाने शहर दुमदुमले

ताज्या बातम्या

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

October 13, 2026
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

October 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In