.
मारेगाव, प्रतिनिधी, प्रणय खैरे… 🖊️…. सारथी महाराष्ट्राचा न्यूज..
मारेगाव तालुक्यात येत असलेल्या, पीजगाव येथील तरुणाने गळफास लावून घेतल्याची प्रथम माहिती समोर आली आहे. हा युवक मजुरी काम करत असल्याचे नागरिकांनी सांगितले होते, तसेच 15 ऑगस्ट ला पहाटे चार वाजता पासून बेपत्ता असल्याचेही मृतकाच्या नातेवाईकांनी सांगितले सगळीकडे शोध घेतल्यानंतर अखेर 16 ऑगस्ट ला तो पाहlपळ ते पीजगाव मार्गावर असलेल्या नादालगत झाडाला गळफास घेऊन आढळला ही माहिती मिळताच पीजगाव येथील पोलीस पाटील यांनी त्वरित मारेगाव पोलीस स्टेशनला फोन करून सूचना दिली या घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठले मृतकाचा शव झाडावरून उतरवून पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय मारेगाव इथे आणण्यात आला आहे. संबंधित इस माने आत्महत्या का केली यामागचे कारण अजूनही स्पष्ट झाले नाही, पुढील तपास मारेगाव पोलीस निरीक्षक सागर दानडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार.











