• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 4, 2026
in Blog
0
वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

वन विभागाच्या कारवाईची ग्रामस्थांची मागणी; बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी

सातारा : सातारा तालुक्यातील पुनर्वसित न्हाळेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. जय संदीप खंडागळे (वय २) असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून ग्रामस्थांमध्ये वन विभागाविरोधात संतापाचे वातावरण आहे.

RelatedPosts

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात

शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास न्हाळेवाडीतील बौद्ध वस्तीच्या पाठीमागील ओढ्याजवळ ही घटना घडली. त्यावेळी गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता. अंधाराचा फायदा घेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने जय याच्यावर झडप घालून त्याला ओढ्याच्या दिशेने नेले.

घटना लक्षात येताच गावातील तरुणांनी तातडीने शोध सुरू केला. ओढ्याजवळ बिबट्या चिमुकल्याला घेऊन असल्याचे दिसताच तरुणांनी आरडाओरड करून त्याला पळवून लावले. जखमी जयला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

गावालगत बिबट्यांचा वावर वाढला असून वन विभागाकडून पुरेशी उपाययोजना होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांचा धोका वाढत असल्याचे सांगत महावितरणविरोधातही ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, वन विभागाने घटनेची तातडीने दखल घेऊन परिसरात पिंजरा लावावा आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

Previous Post

गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात

Next Post

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

Related Posts

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित
Blog

8
Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
21
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
32
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
30
Next Post
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

ताज्या बातम्या

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

October 4, 2026
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026
वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In