शिवसेना तालुका सचिव रवी कांबळे यांची ग्रामपंचायत प्रशासनाकडे मागणी
कानडी : प्रतिनिधी – ग्रामपंचायत कानडी अंतर्गत सुकोडा फाटा-पाच मोरी परिसरातील बंद व नादुरुस्त हातपंप तातडीने दुरुस्त करावेत, अशी मागणी शिवसेना तालुका सचिव रवी कांबळे यांनी केली आहे.
परिसरातील अनेक हातपंप बंद असल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. आगामी काळात पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तातडीने सर्व हातपंपांची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पाणीप्रश्नाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रवी कांबळे यांनी दिला आहे.











