चांदवड तालुक्यात रात्रीच्या वेळी घिरट्या घालणाऱ्या ड्रोनबाबत नागरिकांच्या चिंतेची मा. जिल्हाधिकारी साहेबांनी गंभीर दखल घेतली आहे. ड्रोनच्या हालचाली, नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती आणि याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची प्रशासनाने नोंद घेतली असून, या प्रकरणाची प्रशासकीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे.
या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी राजपूत सर यांनी पोलीस अधीक्षक (SP) साहेबांना पत्र पाठवून संपूर्ण घटनेची माहिती दिली असून, याबाबत चौकशी करण्यास कळविले आहे.
प्रशासकीय पातळीवर अधिकृतपणे दखल मिळाली असून चौकशीची कार्यवाही सुरू झाली आहे.
लवकरच या चौकशीतून ड्रोन नेमके कुणाचे आहेत, ते कोणत्या कारणासाठी उडवले जात आहेत आणि त्यांच्या उड्डाणाबाबत आवश्यक ती अधिकृत माहिती/परवानगी आहे का, याबाबत वस्तुस्थिती स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे.
नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती, शंका आणि संभ्रम दूर होण्यासाठी अधिकृत माहिती समोर येणे महत्त्वाचे आहे. आशा करूया की प्रशासनाच्या चौकशीतून लवकरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल.
@all








