• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुरूम ग्रामीण रुग्णालयातील बंद प्रयोगशाळा चाचण्यांसाठी काँग्रेसची तक्रार

Pratik Tidke by Pratik Tidke
October 8, 2026
in Blog
0
मुरूम ग्रामीण रुग्णालयातील बंद प्रयोगशाळा चाचण्यांसाठी काँग्रेसची तक्रार
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

वैद्यकीय अधीक्षकांकडे तक्रार दाखल; आठ दिवसांत सुविधा सुरू करण्याचे आश्वासन — अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
धाराशिव जिल्हा प्रतिनिधी लाडलेसाब नादाफ मुरूम येथील ग्रामीण रुग्णालयात महालॅबच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विविध प्रयोगशाळा चाचण्या बंद असल्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. आवश्यक रक्त तपासण्या व इतर प्रयोगशाळा चाचण्या उपलब्ध नसल्याने नागरिकांना उपचारासाठी तसेच तपासण्यांसाठी खासगी रुग्णालयांकडे व प्रयोगशाळांकडे जाण्याची वेळ येत आहे. या गंभीर प्रश्नाची दखल घेत मुरूम शहर काँग्रेसच्या वतीने ग्रामीण रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आली.

RelatedPosts

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक महेश अर्दाळे यांच्याकडे बंद असलेल्या प्रयोगशाळा चाचण्या तातडीने सुरू करण्याबाबत सविस्तर तक्रार देण्यात आली. रुग्णालयात CBC, KFT, LFT, Lipid Profile, Hepatitis Antigen, ASLO, HCV यांसह विविध आवश्यक चाचण्या बंद असल्याने रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.
प्रयोगशाळा चाचण्या वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे रुग्णांचे रोगनिदान व पुढील उपचार प्रक्रियेला अडथळा निर्माण होऊ शकतो. विशेषतः ग्रामीण व सर्वसामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयांमध्ये किंवा प्रयोगशाळांमध्ये अतिरिक्त आर्थिक खर्च करावा लागत असल्याने हा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली.
तक्रार प्राप्त होताच वैद्यकीय अधीक्षक महेश अर्दाळे यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या प्रश्नाबाबत माहिती दिली. संबंधित वरिष्ठांकडून येत्या आठ दिवसांच्या कालावधीत आवश्यक प्रयोगशाळा चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

दरम्यान, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला स्पष्टपणे सांगितले की, आठ दिवसांच्या दिलेल्या कालावधीत ग्रामीण रुग्णालयातील बंद असलेल्या प्रयोगशाळा चाचण्या प्रत्यक्षात सुरू झाल्या नाहीत, तर नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या परिसरातील शासकीय रुग्णालयातच आवश्यक आरोग्य तपासण्या उपलब्ध होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू नये आणि उपचारासाठी आवश्यक तपासण्यांची सुविधा वेळेत मिळावी, यासाठी काँग्रेस पक्ष हा प्रश्न पुढेही प्रशासनाकडे लावून धरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या वेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे युवा नेते सिध्दलिंग अप्पा हिरेमठ, संतोष जी येवले सर, राजकुमार जी हिरेमठ, बाबुराव जी बेगमपुरे, सुरेश जी गायकवाड, दिपक जी मुळे, सुनील जी चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
आठ दिवसांत सुविधा सुरू करण्याचे आश्वासन मिळाल्याने आता प्रशासनाच्या कार्यवाहीकडे नागरिकांचे लक्ष लागले असून, दिलेल्या मुदतीत चाचण्या सुरू न झाल्यास पुढील आंदोलनाची दिशा काँग्रेसकडून निश्चित करण्यात येणार आहे.

Previous Post

कणकवलीत पाणी बचतीसाठी नगरपंचायतीचे जाहीर आवाहन.

Next Post

दुष्काळानं आटलं पाणी, शेतकऱ्यांची वणवण अनवाणी

Related Posts

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय
Blog

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

October 8, 2026
1
येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!
Blog

येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!

October 8, 2026
1
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा
Blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

October 8, 2026
1
पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनात वर्धा जिल्हा घटकात जीवन सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे..
Blog

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनात वर्धा जिल्हा घटकात जीवन सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे..

October 8, 2026
3
Blog

कोल्हापुरात किसान सभेच्या २४व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाचा दुसरा दिवस उत्साहात

October 8, 2026
1
लासलगांव बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज योजनेस सुरूवात. – ज्ञानेश्वर (डी. के.) जगताप.
Blog

लासलगांव बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज योजनेस सुरूवात. – ज्ञानेश्वर (डी. के.) जगताप.

October 8, 2026
2
Next Post
दुष्काळानं आटलं पाणी, शेतकऱ्यांची वणवण अनवाणी

दुष्काळानं आटलं पाणी, शेतकऱ्यांची वणवण अनवाणी

ताज्या बातम्या

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

October 8, 2026
येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!

येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!

October 8, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In