• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दुष्काळानं आटलं पाणी, शेतकऱ्यांची वणवण अनवाणी

Pratik Tidke by Pratik Tidke
October 8, 2026
in Blog
0
दुष्काळानं आटलं पाणी, शेतकऱ्यांची वणवण अनवाणी
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

पंचनाम्यांसाठी अधिकारी, नेतेमंडळीची मीन्नतवारी

RelatedPosts

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे.

जामखेड तालुक्यातील शेतातलं पीक वाळून पार कॉळ झालंय.. डोळ्यातलं पाणी आटलंय, पण साहेब, आमच्या पदरात अजूनही फक्त कोरडी आश्वासनंच आहेत. सांगा, लेकरा-बाळांना काय खाऊ घालू आणि दावणीच्या जनावरांना काय देऊ? हा आर्त टाहो आहे, जामखेड तालुक्यातील हतबल शेतकऱ्याचा. हे केवळ एका शेतकऱ्याचे शब्द नसून, आज लाखो दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या काळजातील धगधगता

आक्रोश आहे.

यावर्षी पावसाने पार दडी मारल्यामुळे खरीप हंगाम पूर्णपणे बाबा गेला आहे. सरकारने जिल्ह्यासह जामखेड तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला खरं, पण आता महसूल आणि कृषी विभागाच्या पारंपारिक पंचनाम्यांचा फार्स सुरू झाला आहे. भरउन्हात कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक बांधावर जाऊन माहिती गोळा करत आहेत. मात्र, डोळ्यांदेखत पिकांची राखरांगोळी झालेली असताना आणि

जीआरकडे लागल्या सर्वांच्या नजरा

दुष्काळ जाहीर झाला, महसूल आणि कृषी विभागाच्या पारंपारिक पंचनाम्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी शेतात कधी येणार? त्यांची आशाळभूतपणे वाट पाहणे, ते आल्यानंतर अनवाणी त्यांच्या मागे पुढे फिरून नुकसान दाखविणे, असे सर्रास चित्र दिसते. ते फोटो काढणार? त्यांचा अहवाल तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मंत्रालयात कधी जाणार? आणि तिथून मदतीचा जीआर (शासन निर्णय) कधी निघणार? असा प्रश्न आहे.

शेतात वाळलेली पिके सांगड्यांसारखी उभी असताना कसले पंचनामे करताय, असा थेट आणि रोखठोक सवाल शेतकरी प्रशासनाला विचारत आहेत.

आधी पंचनामे, मग अहवाल, त्यानंतर तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मंत्रालयात फाईल आणि शेवटी जीआर निघणार, या वेळखाऊ सरकारी लालफितीच्या प्रक्रियेत बळीराजा पूर्णपणे उध्वस्त होईल, अशी भीती व्यक्त होत असून थेट मदतीची मागणी जोर धरत आहे. पावसाअभावी विहिरींनी तळ गाठला असून बोअरवेलही बंद पडल्या आहेत. गावागावांत पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू असून, मुक्या जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांचे काळीज चिरत आहे.

सरकार कागदावर टैंकर आणि चारा छावण्यांच्या गप्पा मारत असले, तरी प्रत्यक्षात तळागाळात अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. केवळ दृष्काळ जाहीरच्या या कोरड्या घोषणेने शेतकऱ्यांचे पोट भरणार नसून, प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष कृती करण्याची गरज आहे.

सध्या बड्या नेत्यांचे आणि मंत्र्यांचे ताफे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर धडकतात, बांधावर उभे राहून करपलेली पिके हातात घेतली जातात. कॅमेऱ्यासमोर अश्रू पुसले जातात. घाबरू नका, सरकार तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहे. अशी शब्दांची खैरात वाटली जाते. मात्र, हे ताफे आणि कॅमेरे निघून गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या मागे उरतो तोच भयानक अंधार.

Previous Post

मुरूम ग्रामीण रुग्णालयातील बंद प्रयोगशाळा चाचण्यांसाठी काँग्रेसची तक्रार

Next Post

बाळसमुद्र परिसरात पावसाअभावी शेतकरी चिंतेत

Related Posts

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय
Blog

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

October 8, 2026
7
येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!
Blog

येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!

October 8, 2026
11
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा
Blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

October 8, 2026
7
पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनात वर्धा जिल्हा घटकात जीवन सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे..
Blog

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनात वर्धा जिल्हा घटकात जीवन सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे..

October 8, 2026
3
Blog

कोल्हापुरात किसान सभेच्या २४व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाचा दुसरा दिवस उत्साहात

October 8, 2026
1
लासलगांव बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज योजनेस सुरूवात. – ज्ञानेश्वर (डी. के.) जगताप.
Blog

लासलगांव बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज योजनेस सुरूवात. – ज्ञानेश्वर (डी. के.) जगताप.

October 8, 2026
2
Next Post

बाळसमुद्र परिसरात पावसाअभावी शेतकरी चिंतेत

ताज्या बातम्या

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

October 8, 2026
येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!

येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!

October 8, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In