• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पोलादपूर शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; बंद सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करण्याची भाजपची मागणी, अन्यथा भीक मागून आंदोलनाचा इशारा….

Pratik Tidke by Pratik Tidke
October 8, 2026
in Blog
0
पोलादपूर शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; बंद सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करण्याची भाजपची मागणी, अन्यथा भीक मागून आंदोलनाचा इशारा….
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

पोलादपूर : पोलादपूर नगरपंचायतीच्या हद्दीतील विविध नगरांमध्ये, प्रमुख रस्त्यांवर तसेच महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात आलेले काही सीसीटीव्ही कॅमेरे मागील आठ ते नऊ महिन्यांपासून बंद असल्याचा मुद्दा उपस्थित करत ते तातडीने दुरुस्त करून कार्यान्वित करण्यात यावेत, या मागणीसाठी भाजपच्या वतीने नगरपंचायत प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

RelatedPosts

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

यावेळी भाजपा पोलादपूर शहराध्यक्ष महेश निकम, तालुका सरचिटणीस आशुतोष दरेकर, तालुका उपाध्यक्ष राजेश कदम, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दर्पण दरेकर, तालुका कोषाध्यक्ष राजेश सपकाळ, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सनी जाधव तसेच नरेश शेलार उपस्थित होते.

यावेळी नगरपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले की, शहरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे दीर्घकाळापासून बंद आहेत. यावर प्रशासनाच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखभालीसाठी मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.

यावर युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दर्पण दरेकर यांनी, “मेंटेनन्स करण्यासाठी माणूस उपलब्ध नसेल तर आम्ही भीक मागून आंदोलन करू आणि तुमचा मेंटेनन्सचा खर्च करू,” अशी भूमिका मांडली. त्यावर प्रशासनाने आंदोलन करू नये, आपली समस्या लवकरात लवकर सोडविण्यात येईल, असे आश्वासन दिले.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष महेश निकम यांनी, “गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. नागरिकांकडून विविध प्रकारचे कर घेतले जातात. नागरिकांच्या पैशातून उभारण्यात आलेली यंत्रणा नागरिकांच्या उपयोगाची ठरत नसेल तर कर घेण्याचा उद्देश काय?” असा सवाल उपस्थित केला.

तसेच भविष्यात शहरात चोरी, भांडण, अपघात किंवा अन्य कोणतीही अनुचित घटना घडल्यास सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून घटनेचा तपास करण्यास मदत मिळते. मात्र कॅमेरे बंद असल्यास अशा घटनांची माहिती व पुरावे मिळविण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, असेही यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले.

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने दुरुस्त करून कार्यान्वित करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच भविष्यात सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्यामुळे एखादी अनुचित घटना घडल्यास त्याची प्रशासकीय जबाबदारी नगरपंचायत प्रशासनाची राहील, असा इशाराही देण्यात आला.

नगरपंचायत प्रशासनाने बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिले.

Previous Post

शक्ती पिठ बाधित शेतकऱ्याची व्यथा ऐकून हृदयाला पाझर फोडणारी वेदना

Next Post

लासलगांव बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज योजनेस सुरूवात. – ज्ञानेश्वर (डी. के.) जगताप.

Related Posts

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय
Blog

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

October 8, 2026
2
येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!
Blog

येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!

October 8, 2026
1
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा
Blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

October 8, 2026
1
पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनात वर्धा जिल्हा घटकात जीवन सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे..
Blog

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनात वर्धा जिल्हा घटकात जीवन सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे..

October 8, 2026
3
Blog

कोल्हापुरात किसान सभेच्या २४व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाचा दुसरा दिवस उत्साहात

October 8, 2026
1
लासलगांव बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज योजनेस सुरूवात. – ज्ञानेश्वर (डी. के.) जगताप.
Blog

लासलगांव बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज योजनेस सुरूवात. – ज्ञानेश्वर (डी. के.) जगताप.

October 8, 2026
2
Next Post
लासलगांव बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज योजनेस सुरूवात. – ज्ञानेश्वर (डी. के.) जगताप.

लासलगांव बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज योजनेस सुरूवात. – ज्ञानेश्वर (डी. के.) जगताप.

ताज्या बातम्या

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

October 8, 2026
येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!

येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!

October 8, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In