प्रतिनिधी:- तुषार शिंपी – येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे नुकताच वर्धापन दिन सरस्वती कॉलनीमध्ये उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला साने गुरुजी लिखित खरा तो एकाचे धर्म ही प्रार्थना सर्वांनी म्हटली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा कृष्णा हॉटेलचे संस्थापक यांच्या धर्मपत्नी मंगला कृष्णा धनगर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले. मंडळाच्या सहसचिव डॉ. उज्ज्वला राठी यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षांचा, मंडळाच्या अध्यक्षा शोभा साळी कडून सत्कार करण्यात आला. रजनी काळे यांचा मंडळाच्या उपाध्यक्षा तथा माजी उपनगराध्यक्षा शकुंतला अहिरराव यांनी सत्कार केला. शकुंतला अहिरराव यांनी उपस्थित महिलांना प्रबोधनपर मार्गदर्शन करुन मनोगत व्यक्त केले. निता तिवारी यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्यावर एक सुंदर एकांकिका सादर केली. निशा ठक्कर यांनी प्रजापिता ब्रहम-कुमारी यांचे शिव बाबांचे महत्व व कार्य सांगितले. सभासंचालन शशीकला पांडे यांनी केले. उपस्थित महिलांसाठी मनोरंजक स्पर्धा घेण्यात 2 मिनिटात जास्तीत जास्त फुलवाती बनविणे, 1 मिनिटात पाण्यातून जास्तीत जास्त नाणे काढणे या स्पर्धा लक्षवेधून घेणार्या होत्या. स्पर्धेचे परिक्षण शर्मा मॅडम यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नंदा शुक्ला, संध्या चौधरी, निर्मला लाळगे, कुसुम पाटील यांचेसह उपस्थित सर्व भगिनींनी यांनी परिश्रम घेतले. उज्ज्वला देशपांडे यांनी आभार मानले.










