

अखेर मुख्य रस्त्याने घेतला मोकळा श्वास..
शहरातील शिवाजी चौक ते जुना सरकारी दवाखाना हा रस्ता मुख्य बाजारपेठ रोड म्हणून ओळखला जातो. अनेक वर्षांपासून रस्त्याचे काम न झाल्याने शहरातील व्यापाऱ्यांना धुळीच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते.
शहरातील मुख्य रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे यासाठी व्यापाऱ्यांकडून नगरपरिषदेला वारंवार निवेदने देण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी नगरपरिषदेसमोर उपोषणही करण्यात आले होते.
यानंतर १२ फेब्रुवारी रोजी नगर परिषदेकडून सर्व व्यापाऱ्यांना आठ दिवसांचा अल्टिमेटम देऊन अतिक्रमणे काढून घेण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली होती.
परंतु या नोटिशीला व्यापाऱ्यांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाल्याने अखेर आज मंगळवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी सकाळपासून नगर परिषदेकडून कडक पोलीस बंदोबस्तात जेसीबी च्या सहाय्याने ‘अतिक्रमण हटाव’ मोहीम राबवण्यात आली. कित्येक वर्षांनी रस्ता मोकळा झाल्याने पादचारी व वाहनधारकांकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे..
Discussion about this post